रत्नागिरी जिल्हा अग्रिकल्चर झोन म्हणून जाहीर : लोकांमधे असंतोष

Ratnagiri - Agriculture Zone

रत्नागिरी : रत्नागिरी (Ratnagiri) जिल्हा अग्रिकल्चर झोन (Agriculture Zone) म्हणून जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्याचा विकास सर्व बाजूने रखडणार आहे. या निर्णयामुळे राज्य शासनाच्या विरोधात जिल्ह्यात तीव्र असंतोष पसरला आहे.

जिल्ह्यातील नगरपालिका व नगर पंचायती क्षेत्र वगळून कोठेही नवीन घर अथवा नवीन व्यावसायिक इमारत बांधता येणार नाही. शासनाच्या निर्णयामुळे जिल्ह्यातील शहरांबाहेरचा विकास चोहोबाजूंनी ठप्प होणार आहे. ग्रामीण भागात जुने घर असल्यास ते नियमाला अधीन राहून विकसित करता येईल. मात्र, स्वत:ची जागा असतानाही नवीन घर बांधण्याचे केवळ स्वप्नच राहणार आहे.

या निर्णयामुळे नगरपालिका व नगरपंचायती क्षेत्राजवळील गावांना अधिक फटका बसणार आहे. रत्नागिरी शहराजवळ असलेल्या नाचणे, शिरगांव, कुवारबांव, मिरजोळे, खेडशी, चिपळूण शहराजवळ असलेल्या खेर्डी, वालोपे, मिरजोळे, कापसाळ, दापोलीजवळ असलेल्या जालगांव, खेडनजीकचे भरणे, गुहागरनजीकचे पाटपन्हाळे, शृंगारतळी, लांजाजवळचे कुवे, देवधे, देवरूखनजीकचे साडवली, पाटगांव अशा नजीकच्या गावांमध्ये गुंतवणूक केलेल्या व्यावसायिकांवर त्याचबरोबर तेथील वर्षानुवर्षे राहणाऱ्या नागरिकांना आपल्या जागा विकसित करता येणार नाहीत.

जिल्ह्यात स्वत:ची ओळख निर्माण केलेल्या सावर्डे, मार्गताम्हाने, साखरपा, माखजन, संगमेश्वर, पाली, खंडाळा, पावस, जाकादेवी, पोफळी, अलोरे, जैतापूर, पाचल अशी मोठी बाजारपेठ असलेल्या गावांनाही फटका बसणार आहे. जिल्हा अग्रिकल्चर झोन म्हणून जाहीर झाल्यानंतर येथे औद्योगिक कारखाने येणार नाहीत. त्यामुळे येथील तरूणांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER