रत्नागिरीत खासगी बस 50 फूट खोल दरीत कोसळली, मदत कार्य सुरु

ratnagiri-bus-collapsed-in-kashedi-ghat

रत्नागिरी : रत्नागिरीत खासगी बसचा भीषण अपघात (Bus Collapse) झाला आहे. कशेडी घाटात (Kashedi Ghat) बस तब्बल ५० फूट खोल दरीत कोसळून हा अपघात झाला आहे. चिंतामणी नावाची ही खासगी मुंबईच्या सायन येथून कणकवलीकडे जात असताना कशेडी घाटात तब्बल 50 फुट दरीत कोसळली. आज सकाळी पहाटे चार वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात एका सात वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. तर एक वृद्ध अद्यापही बसमध्ये अडकून आहे. बसमधील 25 जणांना बाहेर काढण्यात यश आलं आहे. मदत कार्य जोरात सुरु आहे

या बसमध्ये 27 प्रवासी होते. त्यापैकी 25 जणांना बाहेर काढण्यात आले आहेत. या प्रकरणी मदत कार्य जोरात सुरु आहे. या बसमधील बहुतेक प्रवासी हे संगमेश्वर येथील रहिवाशी आहेत. जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानांची रुग्णवाहिका तसेच महाराष्ट्र शासनाच्या रुग्णवाहिका घटनास्थळी मदतीला पोहोचल्या आहेत. मदत कार्यात वाचवण्यात आलेल्या 25 जखमी प्रवाशांना पोलादपूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER