रत्नागिरी ब्रेकिंग : उद्या पहाटेपासून वादळ घोंगावणार

Monsoon

रत्नागिरी /प्रतिनिधी : रत्नागिरी तालुक्याला त्यामानाने धोका कमी असला तरी मंडणगड, दापोलीला मोठा धोका असल्याने प्रशासनाने या किनारपट्टी भागातील सुमारे 4 हजार लोकांचे स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या पहाटे 5:30 मिनिटांनी वादळ घोंगावणार असून दुपारी 12 वाजता सुमारे 100 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे चिपळूण, खेड, राजापूर नागरपालिकाना अलर्ट करण्यात आले आहे अशी माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER