
रत्नागिरी : स्थानिक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे आंबा लिलाव प्रक्रिया सुरू करण्यात आली असून आतापर्यत ११ हजार ५४१ मेट्रिक टन आंब्याचा लिलाव करण्यात आल्याने ११ लाख ७५ हजाराची उलाढाल झाली आहे.
जिल्हा उपनिबंधक डॉ. अशोक गार्डी, रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय आयरे, उपसभापती डॉ.अनिल जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली ही लिलाव प्रक्रिया सुरू झाली आहे. वाशी, पुणे, अहमदाबाद येथील व्यापाऱ्यांकडे रत्नागिरीतील सर्वाधिक आंबा पाठवला जातो.
परंतु, वाशी येथील एपीएमसी मार्केटमध्येच कोरोनाग्रस्त रूग्ण सापडल्याने मार्केटमधील खरेदी विक्री काही दिवस थांबविण्यात आली होती. यामुळे खासगी विक्रीवरही परिणाम झाला असल्याने दर गडगडले आहेत. त्यामुळे रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजारसमितीच्या लिलाव प्रक्रियेवर परिणाम झाला आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला