रती अग्निहोत्री : वयाच्या १० व्या वर्षी सुरू केले मॉडेलिंग; कित्येक वर्षे केले पडद्यावर राज्य

जेव्हा सामान्य कुटुंबातील बहुतेक मुले बॉलिवूडमध्ये करिअर बनवण्याविषयी बोलतात तेव्हा इंडस्ट्रीतील संघर्षाच्या कहाण्या लक्षात ठेवून पालक नक्कीच त्यांना आपली निवड बदलण्यास सांगतात. पूर्वीच्या काळात कुटुंबांमध्ये अभिनय करण्याबद्दल आणखी कडकपणा होता. ८० च्या दशकाची प्रसिद्ध अभिनेत्री रती अग्निहोत्री हिचीही अशीच स्थिती होती. रतीच्या संघर्षापासून ते बॉलिवूड करिअरपर्यंतच्या प्रवासाबद्दल आज आपण जाणून घेऊया.

१० डिसेंबर १९६० रोजी उत्तरप्रदेशच्या बरेली जिल्ह्यात जन्मलेली रती मध्यमवर्गीय कुटुंबातील होती. अगदी सक्रिय आणि सुंदर रतीला लहानपणापासूनच अभिनेत्री व्हायचं होतं; पण तिची ही इच्छा तिच्या कुटुंबीयांना आवडत नव्हती. कदाचित रतीमध्ये असलेली अभिनेत्री तिचे कुटुंबीय ओळखू शकले नाहीत.

रतीने आपल्या करिअरची सुरुवात कुटुंबातील सदस्यांविरुद्ध जाऊन तमिळ चित्रपटातून केली. १९७९ मध्ये रतीचा पहिला पुथिया वारपुगल आणि निरम मराठा चित्रपट प्रदर्शित झाले होते. तमिळ चित्रपटापासून रतीला बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली.

बॉलिवूडने रतीचे भविष्य बदलले. १९८१ च्या ‘एक दुजे के लिए’ या चित्रपटातील रतीच्या अभिनयाला इतकी पसंती मिळाली की ती रात्रभरात स्टार बनली. यानंतर रतीने मागे वळून पाहिले नाही. वयाच्या दहाव्या वर्षी मॉडेलिंगला सुरुवात करणार्‍या रतीने त्यानंतर अनेक वर्षे लोकांच्या मनावर राज्य केले.

१९८५ दरम्यान रती बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री होती. तेव्हा रतीने व्यावसायिक आणि आर्किटेक्ट अनिल विरवानी यांच्याशी विवाह केला. त्यांना तनुज नावाचा मुलगा आहे. मात्र काही काळानंतर नवरा-बायकोत मतभेद वाढू लागले आणि अखेर त्यांचा घटस्फोट झाला. प्रसिद्धीच्या उंचीला स्पर्श करूनही रती आपल्या वैयक्तिक आयुष्यात एकटीच राहिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER