नैतिकतेच्या मुद्द्यावर राठोडांचा राजीनामा : संजय राऊत

Sanjay Raut

मुंबई : पूजा चव्हाण (Pooja Chavan) आत्महत्याप्रकरणी अखेर शिवसेनेचे नेते आणि वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी राजीनामा दिला . यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली . नैतिकतेच्या मुद्द्यावर संजय राठोडांनी राजीनामा दिला असल्याचे राऊत म्हणाले .आज दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर जाऊन राठोड यांनी  राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला. ‘मी राजीनामा देतो पण चौकशी पूर्ण होऊ द्यात.

त्यात मी दोषी आढळलो तर माझा राजीनामा मंजूर करा.’ अशी विनंती राठोड यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. यावेळी संजय राठोड प्रकरणाची संपूर्ण चौकशी झाल्यानंतर राजीनामा घ्यावा, अशी विनंती एकनाथ शिंदे यांनी केली होती. पण, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या निर्णयावर ठाम होते, अखेर त्यांनी संजय राठोड यांचा राजीनामा स्वीकारला आहे. पूजा चव्हाण या तरुणीने पुण्यात आत्महत्या केली होती.

त्यानंतर पूजा चव्हाण आणि संजय राठोड यांच्यातील संभाषणाच्या ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या होत्या. त्यामुळे भाजपने संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीसुद्धा संजय राठोड यांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे खुद्द राठोड यांनीच राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. अखेर संजय राठोड यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER