राठोडांचा राजीनामा घेतला, मग मातोश्रीचे परब यांच्यावर इतकं प्रेम का? नितेश राणेंचा सवाल

Anil Parab - Nitesh Rane

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या कथित वसुलीचे गंभीर आरोप झाल्यानंतर आता परिवहनमंत्री अनिल परब यांच्यासह परिवहन विभागातील अधिकाऱ्यांवरही भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत.

निलंबित आरटीओ निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी आरटीओ खात्यात पदोन्नतीसाठी आणि इतर व्यवहारात भ्रष्टाचार होतो असा आरोप केला आहे. अधिकाऱ्यांच्या मदतीने ३०० कोटी रुपयांचा ट्रान्सफर पोस्टिंग घोटाळा केल्याचा आरोप करत नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून चौकशीला सुरुवात झाली आहे. पोलीस उपायुक्त (क्राईम ब्रांच) आणि इतर दोन उपायुक्त या प्रकरणाची चौकशी करत आहेत. मात्र यावरुन भाजपचे आमदार नितेश राणे यांनी निष्पक्ष चौकशीची मागणी करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही लक्ष्य केले आहे.

सध्याच्या कॅबिनेट मंत्र्याविरूद्ध पोलीस स्वतंत्र आणि निःपक्षपाती चौकशी कशी करु शकते ?
अनिल परब यांच्यासाठी नियम वेगळे का आहेत? संजय राठोड राजीनामा देत असतील तर मग निळ्या डोळ्यांच्या मुलासाठी मातोश्रीच इतकं प्रेम का? सीबीआय या प्रकरणाची चौकशी करुन न्याय मिळवून देईल .. यापेक्षा काही कमी नाही, असा टोला नितेश राणे यांनी लगावला आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button