राठोड गेले, देशमुख गेले आता अनिल परबही जातील, किरीट सोमय्यांचा दावा

kirit somaiya - anil parab - Maharastra Today

मुंबई : अनिल देशमुख यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ होताना दिसून येत आहे. त्यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे आरोप झाल्यानंतर या प्रकरणाची चौकशी सीबीयाईकडून केली जाणार आहे. त्यामुळे गृहमंत्रिपदावर राहणे नैतिकदृष्ट्या योग्य नसल्याचे कारण देशमुख यांनी दिले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे राजकारण ढवळून निघालेले असताना भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी आणखी एक मोठा दावा केला आहे. त्यांनी संजय राठोड गेले, अनिल देशमुख (Anil Deshmukh) गेले आता अनिल परबही (Anil Parab) जातील. आता पुढे पुढे बघा या मंत्रिमंडळातील अर्धा डझन मंत्री घरी बसतील, असा गौप्यस्फोट आहे. त्यांच्या या प्रतिक्रियेनंतर आता अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. ते आज औरंगाबादेत पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी सोमय्या म्हणाले की, अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि शरद पवार यांनी महाराष्ट्राची माफी मागायला हवी. संजय राठोड गेले, अनिल देशमुख गेले अनिल परबही जातील. पुढे पुढे पहा या मंत्रिमंडळातले अर्धा डझन मंत्री घरी बसणार आहेत,

दरम्यान, संजय राठोड यांच्यावर एका मुलीच्या मृत्यूनंतर अनेक आरोप केले गेले. या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. राठोड यांनी तत्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी तेव्हा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली होती. विरोध वाढल्यामुळे तेव्हा संजय राठोड यांना आपल्या वनमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर अनिल देशमुख यांच्यावर दररोज १०० कोटी रुपये वसुली करण्याचे आरोप झाल्यानंतर त्यांचासुद्धा राजीनामा घेण्याची मागणी केली जात होती. या प्रकरणावर किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारवर सातत्त्याने टीका केली होती. ट्वविटर, फेसबुक तसेच अन्य माध्यमांचा वापर करुन त्यांनी अनिल देशमुख तसेच सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला होता. त्यांतर आता सीबीआय चौकशीचे आदेश उच्च न्यायालयाने दिल्यानंतर देशमुख यांनी राजीनामा दिला आहे. याच मुद्द्यावर बोलताना त्यांनी परिवहनमंत्री अनिल परब यांचा उल्लेख करुन तेसुद्धा लवकरच घरी बसतील, असे वक्तव्य केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button