भारत चीन युद्धामुळं तुटलं होतं रतन टाटांचं लग्न!

Ratan Tata - Editorial

टाटा (TATA) उद्योग समुह आणि पर्यायानं भारताला जागतिक पातळीवर नवी ओळख निर्माण करुन देणारं नावं, रतन नवल टाटा (Ratan Naval Tata). ज्यांनी आयुष्यात धाडसी निर्णय घेतले. स्वतःला झोकून देवून काम केलं. घेतलेले निर्णय योग्य ठरवले. जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर टाटाच्या नावाचा डंका जगभरात वाजवणाऱ्या रतन टाटांच्या आयुष्यातले ह्या काही गोष्टी तुम्हाला माहिती असायला हव्यात.

फोर्डने (Ford) केलेल्या अपमानाचा असा घेतला बदला

ही गोष्ट आहे १९९९ची. टाटांनी इंडीका कार मार्केटमध्ये आणली होती. या कारमुळं कंपनीला विशेष असा फायदा झाला नाही. झालं ते नुकसानच. रतन टाटांनी ही कार कंपनी विकायचा निर्णय घेतला. अमेरिकेची फोर्ड कंपनी टाटांच्या कार्सचे व्हेंचर खरेदी करणार होती. दोन मिटींग झाल्या. एक भारतात तर दुसरी अमेरिकेत. दुसऱ्या मिटींगला फोर्डच्या अधिकाऱ्यांचे बोलणे अहंकाराने भरलेले होते. टाटांची इंडीका विकत घेवून आम्ही टाटांवर उपकार करतोय अशी त्यांची भावना होती. त्यांच्या बोलण्यात वारंवार ही गोष्ट जाणवत होती.

फोर्डचा एक अधिकारी म्हणाला, “जर तुम्हाला पॅसेंजर कारमधलं काही माहिती नाही तर तुम्ही या क्षेत्रात का उतरलात, तुमची कार व्हेंचर खरेदी करुन आम्ही तुमच्यावर उपकारच करत आहोत.” ही गोष्ट रतन टाटांच्या मनाला लागली. त्यांनी डील कॅंसल केली.

या गोष्टीला ९ वर्ष होवून गेल्यानंतर रतन टाटांच्या हाती संधी आली, अपमानाचा बदला घेण्याची. २००८ला फोर्डचं दिवाळ निघालं. लिलावात निघायची वेळ आलेल्या फोर्डच्या जॅग्युवार आणि लँडरोव्हर कारच्या कंपन्यांची टाटांनी खरेदी केली. या खरेदी व्यवहारावेळी फोर्डचे मालक बिल फोर्ड स्वतः रतन टाटांना म्हणाले होते, ” या कार व्हेंचर्सची खरेदी करुन तुम्ही आमच्यावर उपकार करताय.

भारत- चीन (India-China) युद्धामुळं मोडलं लग्न

रतन टाटा आयुष्यभर काम करत राहिले. आता ही करताहेत. त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल बोलयायला त्यांना आवडत नाही. पण एका मुलाखतीत त्यांनी आयुष्यातला सर्वात नाजूक प्रसंग सांगितला होता.

शिक्षणासाठी अमेरिकेत असताना त्यांचे एका अमेरिकन मुलीसोबत प्रेमसंबंध जुळले होते. दोघांचं नातं खुप मॅच्यूअर होतं. दोघे लग्न करणार होते. पण मुलीची इच्छा भारतात यायची नव्हती.

त्याच दरम्यान भारत आणि चीनमध्ये युद्धाला सुरुवात झाली. रतन टाटांच्या आजीची तब्येत बिघडली. या कारणासाठी रतन टाटांना भारतात परतावं लागलं. रतन टाटा भारतात आले त्यांची प्रेयसी अमेरिकेतच राहिली. नंतरच्या काळात त्या मुलीनं अमेरिकेतल्याच युवकासोबत लग्न केलं. यानंतर चारवेळा टाटांच लग्न होता होता राहिलं. एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आयुष्यातल्या या पैलूंवर प्रकाश टाकला होता.

ताज हॉटेलवर (Taj Hotel) हल्ल्याच्यानंतर कर्मचाऱ्यांना मदत

कामगारांना सर्वोत्कृष्ठ सेवा पुरवण्याच काम टाटा ग्रुप करतो. सर्वकाही व्यवस्थीत असताना टाटा त्यांच्या कर्मचाऱ्यांची प्रचंड काळजी घेत असतात. संकंट समयी टाटा कर्मचाऱ्यांसाठी सर्व बाजूंनी मदत करतात. २००८ला मुंबईवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. २६/११च्या या हल्ल्यात ताज हॉटेलला निशाणा बनवण्यात आलं होतं. यात अनेक पर्यटक आणि हॉटेल कर्माचाऱ्यांचा मृत्यू झाला तर बरेच जण जखमी झाले होते.

घडल्या प्रकारानंतर टाटांनी मन मोठं करत हॉटेलमध्ये जखमी झालेल्या सर्वांच्या उपचाराचा खर्च उचलला. उपचार सुरु असलेल्यांच्या प्रकृतीची चौकशी करायलाही रतन टाटांनी हॉस्पीटल्सना भेट दिली होती.

या सोबतच हॉटेलच्या आवारात असलेल्या पावभाजी आणि मासे विक्रेत्यांवर या हल्ल्याचा परिमाण झाला होता त्यांच्या उपचाराचा खर्चही टाटांनी उचलला. जेवढे दिवस ताज हॉटेल बंद होतं तितक्या दिवसाचा पगार टाटांनी कर्मचाऱ्यांना दिला होता,.

टाटा ग्रुपमध्ये लागली नोकरी सरकारी नोकरी सारखी असल्याचं मानलं जातं. कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सवलती सरकारी अधिकाऱ्यांच्या तोडीसतोड असतात. २६/११ च्या हल्ल्यानंतर टाटांनी जबाबदार भूमिका घेतली. टाटांच्या या भूमिकेमुळं त्यांच्यावर कौतूकाचा वर्षावरही झाला होता.याच हल्ल्यात जखमी झालेल्या आणि प्राण गमावलेल्यांच्या नातेवाईकांना मदतीसाठी बरेच महिने सरकारी कार्यालायात खेटे घालावे लागले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER