रतन टाटांचा दिलदारपणा ! पुण्याला जाऊन आजारी कर्मचाऱ्याची घेतली भेट

ratan Tata

मुंबई :  टाटा समूहाचे चेअरमन रतन टाटा यांनी संकटकाळात मदतीसाठी धावून जाणाऱ्या पुन्हा एकदा सगळ्यांची मनं जिंकली आहेत. कंपनीतील निवृत्त कर्मचारी आजारी असल्याचे कळल्यानंतर टाटांनी थेट पुणे गाठले आणि भेटून प्रकृतीची विचारपूस केली. लिंक्डइनवर एका व्यक्तीने केलेल्या पोस्टमुळे टाटांचे संवेदनशील व्यक्तिमत्त्व  समोर आले आहे. टाटा कंपनीत कार्यरत असलेला एक सेवानिवृत्त कर्मचारी मागील दोन वर्षांपासून आजारी आहे.

या कर्मचाऱ्याच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी रतन टाटा मुंबईहून पुण्याला गेले आणि माजी कर्मचाऱ्याची भेट घेतली. त्यांच्या या भेटीचा फोटो सध्या व्हायरल झाला आहे. यावेळी टाटांनी कर्मचाऱ्याच्या प्रकृतीची चौकशी केली. त्याचबरोबर त्याच्या संपूर्ण कुटुंबाचा आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याचे आश्वासन  दिले .

कोणताही गाजावाजा न करता, कोणतीही सुरक्षा न घेता सर्वसामान्य माणसाप्रमाणे रतन टाटांनी माजी कर्मचाऱ्याचे घर गाठले आणि सुखद धक्का दिला. त्यामुळे माजी कर्मचारीही भारावून गेला. त्याचबरोबर नेटकऱ्यांनी टाटांचे कौतुक केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER