रतन टाटांनी दिवाळीत कार्यालयात लावला आशेचा दिवा

Ratan Tata

मुंबई : उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) केवळ त्यांच्या व्यावसायिक कौशल्यांसाठीच नव्हे तर त्यांच्या परोपकारी प्रयत्नांसाठीही प्रसिद्ध आहेत. नुकताच त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकून आपल्या उदारतेची झलक दाखवली.

टाटा समूहाच्या माजी अध्यक्ष रतन टाटा अनेकदा त्यांच्या प्राण्यांवर, विशेषत: रस्त्यावरच्या कुत्र्यांवरील प्रेमाबद्दल पोस्ट्स शेअर करतात. दिवाळीच्या (Diwali) दिवशी टाटा यांनी गोवा नावाच्या त्याच्या “ऑफिस सोबती” सह इतर कुत्र्यांसोबत वेळ घालवल्याची पोस्ट केली होती.

वेल्फेअर ऑफ स्ट्रे डॉग्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी अबोध आरस यांनी सांगितले की, “बॉम्बे हाऊसमध्ये दत्तक कुत्र्यांसाठी घर बांधले गेले. रतन टाटा यांनी केलेले प्राणीमित्र उपक्रम पाहून आम्हाला आनंद होतो. इथल्या आणि परिसरातील प्राण्यांची तपासणी करण्यासाठी आमची स्वयंसेवी संस्था नियमितपणे या इमारतीला भेट देतात. टाटा समूह परिसरातील इतर कुत्र्यांचीही काळजी घेते. सर्व गृहनिर्माण संकुलांनी यापासून बोध घ्यायला हवा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER