रतन टाटा यांनी घेतली कोरोनाची लस, ट्वीट करत लिहिला खास संदेश

Ratan Tata - Vaccine - Maharastra Today

मुंबई : देशातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांनी कोरोना लस (Corona Vaccine) घेतली. ही लस घेतल्यानंतर रतन टाटा म्हणाले, की लस घेताना मला थोडाही त्रास झाला नाही. ही संपूर्ण प्रक्रिया अतिशय सोपी आहे. ते म्हणाले, मला आशा आहे, की देशातील प्रत्येक नागरिक कोरोनाची लस घेईल. लस घेतल्यानंतर रतन टाटा यांनी ट्वीटही केले आहे.

टाटा आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले, आज मी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. यासाठी मी आभारी आहे. ही खूपच सोपी प्रक्रिया आहे आणि यात लस घेताना काही त्रासही होत नाही. मला आशा आहे, की प्रत्येक व्यक्तीला लवकरच ही लस दिली जाईल. रतन टाटा यांनी लस घेतल्यानंतर केलेल्या या ट्वीटनंतर आता देशात लसीकरणाच्या अभियानाला गती येईल, असं म्हटलं जात आहे. ८३ वर्षीय रतन टाटा यांनी या लसीबद्दल दिलेली माहिती ही त्यांच्या वयातील किंवा इतर सर्वांनाच लसीबद्दल विश्वास देणारी आहे. त्यामुळे, या गोष्टीचा नक्कीच फरक पडेल, असा अंदाज व्यक्त होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER