रश्मी शुक्लांनी केली दोन नेत्यांची नावे उघड; भातखळकरांनी वाढवला सस्पेन्स

Rashmi Shukla - Atul Bhatkhalkar

मुंबई : ‘आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांनी राज्य सरकारकडून चौकशी होण्यापूर्वीच महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) ‘कार्यक्रम’ उरकून टाकला.’ असे वक्तव्य भाजप (BJP) नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी केले. काही दिवसांपूर्वी हैदराबादमध्ये CBIने रश्मी शुक्ला यांची चौकशी केली. या चौकशीत रश्मी शुक्ला यांनी महाविकास आघाडीतील दोन नेत्यांची नावे उघड केल्याचे अतुल भातखळकर यांनी सांगितले.

यासंदर्भात अतुल भातखळकर यांनी ट्विट केले. “आयपीएस रश्मी शुक्ला यांनी हैदराबादमध्ये CBI चौकशीत अनेक गौप्यस्फोट केले आहेत. त्यामध्ये दोन अनिल, त्यांचे चेलेचपाटे आणि एका बड्या नेत्याचे नाव आहे. राज्य सरकारने शुक्ला यांची चौकशी करण्यापूर्वी बाईंनी त्यांचा कार्यक्रम उरकून टाकला आहे.” यामधील एक माजी गृहमंत्री अनिल देशमुख तर दुसरा परिवहनमंत्री अनिल परब असण्याची शक्यता आहे. मात्र, त्यांचे चेलेचपाटे आणि आणखी एक बडा नेता कोण असावा, याची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे.

मंत्र्यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केल्याचा आरोप रश्मी शुक्ला यांच्यावर आहे. या प्रकरणी जबाब नोंदवण्यासाठी आज सायबर पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्यास शुक्लांना समन्समध्ये सांगितले होते. कोरोनाची परिस्थिती पाहता हजेरी शक्य नसल्याचे उत्तर रश्मी शुक्ला यांनी सायबर पोलिसांनी दिले.

चौकशीची खूपच घाई असेल, तर प्रश्न पाठवून द्या, त्याची उत्तरे देईन, असे रश्मी शुक्ला यांनी सायबर सेलला सांगितले. रश्मी शुक्ला सध्या केंद्रीय राखीव पोलीस दलात अतिरिक्त महासंचालक पदावर हैदराबाद येथे कार्यरत आहेत. फेब्रुवारी महिन्यापासून त्या केंद्रात प्रतिनियुक्तीवर आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google buttonv