पक्ष नेतृत्वाला कामाची कदर नसल्याने, शिवसेनेत प्रवेश केला – रश्मी बागल

rashmi-bagal-join-shiv-sena-matoshri

पुणे :- मागील १३ वर्षांपासून शरद पवारांचे बोट धरून आम्ही राजकारणात आम्ही सुरवात केली. त्यांचे व आमचे नाते एक नेता व कार्यकर्त्याच्याही पलीकडे आपुलकीचे आहे़ ते नाते कायम ठेवत जनतेला न्याय व सुरक्षितता देण्यासाठी लोकाग्रहास्तव आणि पक्ष नेतृत्त्व कामाची कदर करत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून शिवसेना प्रवेशाचा निर्णय घेतल्याचे रश्मी बागल यांनी म्हटले आहे. आज राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या करमाळ्यातील नेत्या रश्मी बागल, त्यांचे बंधू दिग्विजय बागल, विलास घुमरे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांना आज शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधले आणि रश्मी बागल यांच्या हाती भगवा दिला.

ही बातमी पण वाचा : राष्ट्रवादीला गळती सुरूच; आता अजित पवारांचा सगळ्यात जवळचा सहकारी शिवसेनेत ?

रश्मी बागल या शिवसेनेत प्रवेश करणार, हे दोन दिवसांपूर्वीच निश्चित झाले होते. तशी घोषणाही त्यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन केली. मात्र आमदार सदा सरवणकर यांच्या मातोश्रींचे निधन झाल्यामुळे रश्मी बागल यांचा शिवसेना प्रवेश एक दिवस लांबणीवर पडला होता. त्यामुळे आज त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

दरम्यान, रश्मी बागल यांच्यासह इगतपुरी-त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदार संघातील काँग्रेस आमदार निर्मला गावित यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी त्यांच्या समर्थकांनीही शिवसेनेत प्रवेश केल्याचे जाहीर केले.