उमेदवारी मिळण्याची खात्री मिळाल्यानेच, उद्या शिवबंधन हाती बांधणार – रश्मी बागल

Rashmi Bagal

करमाळा :- करमाळ्याच्या रणरागिणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्या रश्मी बागल-कोलते ह्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी सोडत उद्या ता.२० ऑगस्ट (मंगळवार)ला दुपारी १२ वाजता मुंबई येथे मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले आहे. करमाळा येथिल बागल गटाच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे .

शिवसेनेचे जलसंधारणमंञी प्रा तानाजी सावंत यांच्या माध्यमातून हा प्रवेश होत आहे.यावेळी बोलताना रश्मी बागल म्हणाल्या की, “तिकीट मिळण्याची खात्री आहे, म्हणूनच शिवसेनेत प्रवेश करणार आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांना आमच्यावर होणा-या अन्यायाबाबात पत्र लिहुन, मेसेज टाकून ही काही प्रतिपादन मिळाला नाही. शेवटी कार्यकर्त्यांच्या साठी आम्ही हा निर्णय घेतला. आमची माणसं असुरक्षितत झाली. तयावर इलाज म्हणून हा निर्णय आहे. पाच वर्ष पोळलो आहे. आजपर्यंत चुका झाला आता त्याच चुका आता करायच्या नाहीत.”

ही बातमी पण वाचा : एकेकाळी जनतेची मदत करण्यासाठी वेडे झालेले शरद पवार मी पहिले – महानोर

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी आम्ही निष्ठेने आणि प्रामाणीकपणे काम केले. पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी दिलेला शब्द कधी खाली पडू दिला नाही. लोकसभेच्या निवडणूकीत सर्व मतभेद विसरून एकदिलाने पक्षाने दिलेल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी मैदानात उतरलो. केवळ उतरलोच नाही तर उमेदवारापेक्षाही अधिक सभा, बैठका, प्रचार फेऱ्या, जनतेशी संवाद साधून उमेदवाराला तालुक्यातून लिड मिळवून दिले. पक्षानी दिलेल्या शब्दाला जागलो. ही तळमळ, धडपड तालुक्यातील संपुर्ण जनतेने जवळून अनुभवली आहे. पण दुर्दैवाने आपल्या उमेदवाराला अपयश आले.

संजय मामांनी तळागाळातील सामान्य माणसांना सोबत घेऊन उभा केलेला हा बागल गट आहे. याची वाढ करायची असेल, योग्य दिशा देऊन पुढे घेऊन जायचे असेल तर त्यासाठी हा निर्णय घेणं गरजेचे होते. असे म्हणत रश्मी बागल यांनी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले.

दरम्यान, रश्मी बागल यांचे बंधू दिग्विजय बागल यांनी फेसबुकच्या माध्यमातून शिवसेना प्रवेशाच्या बातमीला दुजोरा दिला आहे.