जेम्स पॕटिसनने केलेला विक्रम क्वचितच कुणी केला असेल!

James Pattison

मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) आयपीएल 2020 (IPL 2020) साठी संघात लसिथ मलिंगाच्या (Lasith Malinga) जागी स्थान दिलेला गोलंदाज जेम्स पॕटीसन (James Pattison) याने असा विक्रम केलाय जो क्वचितच कुणी केला असेल.

मुंबई इंडियन्सने यंदा आतापर्यंत जे चार सामने जिंकले आहेत त्या प्रत्येक सामन्यात त्याने प्रतिस्पर्धी संघातर्फे सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाची विकेट काढली आहे. यात कोलकाता नाईट रायडर्सचा पॕटरसन कमीन्स (33 धावा) , किंग्ज इलेव्हनचा निकोलस पूरन (44 धावा), हैदराबादचा डेव्हिड वाॕर्नर (60 धावा) आणि राजस्थानचा जोस बटलर (70 धावा) यांचा समावेश आहे. या चौघांनीही मुंबई विरुध्दच्या सामन्यात आपल्या संघातर्फे सर्वाधिक धावा केल्या पण ते पॕटीसनचेच बळी ठरले. या चौघांनाही त्याने झेल देण्यास भाग पाडले होते. हा योगायोग नक्कीच पण असा योगयोग पुन्हा कधी घडेल का, याची शक्यता कमीच आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER