पश्चिम घाटात दिसली दुर्मिळ लाजवंती

Slender Loris

कोल्हापूर :- कोल्हापूर (Kolhapur) आणि सिंधुदुर्ग (Sindhudurg) या दोन्ही जिल्ह्यांच्या  हद्दीत पश्चिम घाटातील घनदाट जंगलात ‘स्लेन्डर लोरीस’ (Slender Loris) (लाजवंती) या दुर्मिळ माकडाचे दर्शन झाले आहे. लाजवंती या माकड कुळातील दुर्मिळ प्राण्याचे वास्तव्य भारतासह श्रीलंकेच्या घनदाट जंगलात आढळले होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिलारीच्या घनदाट जंगलात या प्राण्याचे वास्तव्य आढळून आल्याने वन्यजीव संशोधकांत आनंदाचे वातावरण आहे.

सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये घनदाट जंगल आहे. स्थानिक वन्यप्रेमींना या लाजवंती माकडाचे दर्शन आंबोली-दोडा मार्ग या परिसरातल्या जंगलात झाले. लाजवंती हे माकड निशाचर असून ते अत्यंत हळुवार हालचाल करते. हुबेहूब एखाद्या लहान मुलासारखा त्याचा चेहरा असतो. काही ठिकाणी या प्राण्यास स्थानिक लोक वनमानव म्हणूनही संबोधतात. याचा आकार ४० सेंटीमीटरपर्यंत असतो. तर वजन फक्त २०० ग्रॅमपर्यंत असते. काही वर्षांपूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीमध्ये तस्करीकडे एक स्लेन्डर लोरीस सापडले होते. तस्कराच्या तावडीतून त्याला सोडवून वन खात्याने त्या माकडाला तिलारीच्या घनदाट जंगलात सोडलं होतं. आता लाजवंती या माकडाची तस्करी मोठ्या प्रमाणात होते. तिलारीच्या जंगलात या माकडाचा वावर असल्याचे स्पष्ट झाल्याने तस्करी रोखण्याचे मोठे आव्हान वन विभागाकडे असणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER