
रत्नागिरी/प्रतिनिधी : संगमेश्वर तालुक्यातील कोंडीवरे येथे आज दुर्मीळ वन्य प्राण्यांपैकी एक असलेल्या व बिबट्याचाच एक प्रकार असलेल्या ‘बगीरा’ अर्थात ब्लॅक पॅन्थरने (बिबट्या) दर्शन दिले. वन विभागाने याला दुजोरा दिला असून त्याच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी लवकरच त्या अधिवासात कॅमेरे लावण्यात येणार असल्याचे वन विभागाने सांगितले. रत्नागिरी जिल्ह्यात ब्लॅक पँथर आढळत नाहीत. ब्लॅक पॅन्थर ही बिबट्याची जात आहे. त्याचा रंग पूर्ण काळा असल्याने तो विशेष आणि दुर्मिळ आहे. यापूर्वी राजापूर तालुक्यात विहिरीत पडलेल्या ब्लॅक पॅन्थरला जीवदान देण्यात आले होते.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला