‘रॅपिडो’ची बाईक वाहतूक सेवा मुंबईत सुरू; सरकार म्हणते परवानगी नाही !

Rapido

मुंबई : ‘रॅपिडो’ (Rapido) कंपनीची बाईक (दुचाकी) वाहतूक सेवा शुक्रवारपासून मुंबईत सुरु झाली आहे. मात्र, या सेवेला सरकारने परवानगी दिली नाही, असे राज्य परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे (Avinash Dhakne) यांनी सांगितले.

‘रॅपिडो’ २०१५ ला स्थापन झाली. ही कंपनी सध्या १०० शहरात सेवा देते आहे. कंपनीच्या ऍप वरून कमी अंतरासाठी बाईक बुक करून ६ रुपये किलोमीटर दराने प्रवास करता येतो. आम्ही यासाठी दोन हजार चालक उपलब्ध केले आहेत.

राज्य परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे म्हणाले की, याबाबत कंपनीने १५ दिवस आधी म्हज्याशी संपर्क केला होता. चाचणी स्वरूपात सेवा सुरु करण्याची परवानगी मागितली होती. मी त्यांना याबाबत प्रस्ताव सादर करण्याची सूचना करून सांगितले होते की, राज्य वाहतूक प्राधिकरण याबाबत निर्णय घेईल. परिवहन खाते कोरोनाच्या साथीच्या काळात बाईक वाहतूक सेवेला परवानगी देण्यास तयार नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER