औरंगाबाद : लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार, ४ वेळा गर्भपात

Rape

औरंगाबाद : लग्नाचे आमिष दाखवून ३ वर्षे अत्याचार करून नंतर लग्नास नकार देणाऱ्या यवतमाळ येथील कौस्तुभ झामरेविरोधात सिडको पोलिस ठाण्यात बलात्कारासह अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. २०१८ पासून एकाच वर्गात शिकत असलेल्या कौस्तुभ व तरुणीमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले.

औरंगाबाद : शिवजयंती निमित्त वाहतूकीत बदल

त्यानंतर कौस्तुभने तिला लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यादरम्यान तरुणी ४ वेळा गर्भवती राहिली असता तिचा गर्भपात केला. शेवटी तिच्यापासून सुटका मिळवण्यासाठी सौरभने जातीचे कारण पुढे करून लग्नास नकार दिला. त्या नंतर पिडीतेने पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणी गुन्हा दाखल केल्याचे निरीक्षक अशोक गिरी यांनी सांगितले.