पोलीस उपायुक्तांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

औरंगाबाद : पोलिस कॉन्स्टेबल महिलेच्या २२ वर्षीय मुलीला नोकरीचेआमिष दाखवत पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे (परिमंडळ 2) यांनी घरी बोलावून बलात्कार केल्याचा किळसवाणा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांच्या विरोधात पीडित मुलीने बलात्काराची तक्रार दिली. यावरून एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात मंगळवारी मध्यरात्री श्रीरामे यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी कि, पोलिस कॉन्स्टेबल महिलेच्या २२ वर्षीय मुलीला नोकरीचे आमिष दाखवत उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी घरी बोलावून बलात्कार केला. अशी तक्रार पीडित मुलीने काही दिवसांपूर्वी केली होती. यानंतर श्रीरामे रजेवर गेले होते. मुलीच्या तक्रारी वरून काल मध्यरात्री एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात त्यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक तपास डीसीपी विनायक ढाकणे करत आहेत.