भाच्यानेच केला मामीवर बलात्कार; नात्याला काळीमा फासणारी घटना

Rape

औरंगाबाद : बालपणापासून मुलगा समजून संगोपन केलेल्या वीस वर्षीय भाच्याने सख्ख्या मामीवर राहत्या घरी बलात्कार केल्याचा लज्जास्पद प्रकार उघडकीस आला आहे. नात्याला काळिमा फासणारी ही घटना गुरूवार (दि. १०) रात्री पांढरी पिंपळगाव (ता. औरंगाबाद) येथे घडली. याबाबत रविवारी (दि.१३) पिडीत मामीने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी वीस वर्षीय संशयित आरोपीविरूध्द बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

ही बातमी पण वाचा:- अभिनेत्री होण्याच्या स्वप्नात तरुणी पोहचल्या कुंटनखाण्यात…

प्राप्त माहितीनुसार, हा भाचा मूळचा नगर जिल्ह्यातील असून तो लहानपणापासून पांढरी पिंपळगाव येथील मामाकडे वास्तव्यास आहे. दरम्यान मुलाप्रमाणे संभाळलेल्या मामीवरच त्याची काही दिवसांपासून वाईट नजर होती. गुरूवारी रात्री घरात कोणी नसल्याचा फायदा घेत त्याने जबरदस्ती करून मामीवर बलात्कार केला. याबाबत कुठेही वाच्यता केल्यास मामीसह मामास ठार मारण्याची धमकी दिली.

दरम्यान याबाबत पतीने विश्वासाता घेत पत्नीला विचारपूस केली असता, नात्याला काळीमा फासणाऱ्या घटनेचा उलगडा झाला. यावरून पिडीतेने रविवारी पहाटे करमाड पोलिस ठाणे गाठून बलात्काराची तक्रार दिली. घटनेनंतर आरोपी फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.