पंजाबमध्ये बालिकेची अत्याचारकरून हत्त्या; राहुल गांधी गप्प का? – निर्मला सीतारामन

Nirmala Sitaraman & Rahul Gandhi

दिल्ली : पंजाबमधील होशियारपूर येथे सहा वर्षांच्या बालिकेवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली. तिचे शव जाळण्याचाही प्रयत्न झाला. या घटनेबाबत राहुल गांधी गप्प का, असा प्रश्न केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी विचारला आहे.

राहुल महिला अत्याचाराच्या घटनांबाबतही राजकारण करतात, असा आरोप करताना त्या म्हणाल्यात, हाथरसमध्ये बलात्कार आणि हत्याकांड झाले त्यावेळी राहुल गांधी राजकारण करण्यासाठी तिथे गेले होते. मात्र काँग्रेसची सत्ता असलेल्या पंजाबमध्ये एका बालिकेवर बलात्कार झाला तेव्हा राहुल गांधी शांत बसले, का?

मला काँग्रेस पक्षाला विचारायचे आहे की जिथे तुमचे सरकार नाही तिथे बलात्कार झाला तर तुम्ही बहीण-भाऊ त्या ठिकाणी कारने जाऊन पिकनिकसारखे प्रदर्शन करता. पंजाबच्या होशियारपूरमध्ये बलात्कारची घटना घडली, एका बालिकेची हत्याही झाली. तरीही राहुल गांधी आणि प्रियंका गांधी शांत का आहेत? प्रत्येक घटनेवर ट्विट करणारे राहुल गांधी होशियारपूरबाबत शांत का बसले आहेत? पंजाबमध्ये काँग्रेसची सत्ता आहे म्हणून ते गप्प बसलेत का?, असा प्रश्न सीतारामन् यांनी केला.

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही या प्रकरणी राहुल गांधींवर टीका केली. म्हणाले – राहुल गांधी कळकळीने हाथरसला गेले होते. आता होशियारपूरमध्ये घडलेल्या घटनेबाबत राहुल गांधी गप्प का बसले आहेत? ही घटना घडून तीन दिवस झालेत तरीही राहुल गांधी तिथे का गेले नाहीत? या प्रकरणातल्या आरोपींना अटक करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER