रावसाहेब दानवेंना पराभूत केल्याशिवाय टोपी काढणार नाही! अब्दुल सत्तार

Abdul Sattar

परभणी : केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंना (Raosaheb Danve) लोकसभेच्या येत्या निवडणुकीत पराभूत केल्यानंतरच डोक्यावरची टोपी उतरवणार असे राज्याचे महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी पूर्णा येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारसभेत सांगितले.

ते पूर्णा शहरात शिवसेनेच्या (Shiv Sena) संघटनात्मक बांधणीसाठी व ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आयोजित तालुकास्तरावरील मेळाव्यात बोलत होते. केंद्र शासनाच्या धोरणावर कडाडून टीका करताना त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यावरही टीका केली. दानवे याना आगामी लोकसभा निवडणुकीत पराभुत केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे म्हणालेत. कार्यक्रमात पूर्णा तालुक्यातील बिनविरोध निवडून आलेल्या ग्रा.पं. सदस्यांचा सत्कार करण्यात आला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER