लोकांच्या गर्दीत जाण्याची सवय नसल्याने राहुल गांधी पडले – रावसाहेब दानवे

Raosaheb Danve-Rahul Gandhi.jpg

लातूर : नुकतच उत्तर प्रदेशातील हाथरस सामूहिक बलात्कार (Hathras gang rape) पीडित कुटुंबाला भेटण्यासाठी निघालेल्या काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) याना यमुना एक्स्प्रेसवेवर पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला होता. या वेळी राहुल गांधी आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाली होती. आणि त्यातच ते जमिनीवर पडले होते. आणि यावरून केंद्रीयमंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी राहुल गांधींची खिल्ली उडवली आहे.

लोकांच्या गर्दीत जाण्याची सवय नसल्याने गर्दीत कसं चालावं हे त्यांना कळलं नाही. यामुळे राहुल गांधी पडले. असा टोला दानवे यांनी लगावला आहे.

तसेच मागासवर्गीय आयोगाची समिती नियुक्त करून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात मराठा समाजाला आरक्षण दिले होते. मात्र सदर प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सरकारने आरक्षण टिकविण्यासाठी प्रयत्न करायला हवे होते. मात्र त्यांना आपली बाजू नीट मांडता आली नाही. त्यामुळे मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली, असे दानवे यांनी यावेळी नमूद केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER