
औरंगाबाद : केंद्रीय मंत्री व जालन्याचे खासदार रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी अर्थसंकल्पाबाबत पत्रकार परिषद घेतली. एका पत्रकाराने दानवेंना त्यांचे जावई हर्षवर्धन जाधव (Harshvardhan Jadhav) यांच्याबद्दल प्रश्न विचारला. यावर दानवे संतापले व प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराला त्यांनी ‘जावयाला जाऊन भेट’ असा तिरकस सल्ला दिला.
या संदर्भात उल्लेखनीय आहे की, काही दिवसांपासून रावसाहेब दानवे आणि जावई हर्षवर्धन जाधव यांच्यात संघर्ष सुरू आहे. दानवे यांनी पुण्यात माझ्याविरुद्ध खोटा गुन्हा दाखल केला असे नुकतेच जाधव म्हणालेत. दानवे यांचे राजकारण संपुष्टात आणेन, असा दावाही जाधव यांनी केला आहे. जाधव पुन्हा राजकारणात सक्रिय होणार असल्याची चर्चा आहे. दानवे यांची मुलगी व हर्षवर्धन यांची पत्नी संजना यांनी पोलीस ठाण्यात तक्रार देत, जाधव मला मारहाण करतात, असा आरोप केला होता.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला