रावसाहेब दानवे जोड्याने मारायच्या लायकीचे; रघुनाथदादा पाटील संतापले

Raghunath Dada Patil & Raosaheb Danve.jpg

पुणे : दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचा दावा भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केला. याबाबत त्यांच्यावर टीका होते आहे. शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील (Raghunathdada Patil ) दानवेंबद्दल संताप व्यक्त करताना म्हणाले – रावसाहेब दानवे हे जोड्याने मारायच्या लायकीचे आहेत, त्यांच्याबद्दल जास्त बोलण्यात काही अर्थ नाही.

रघुनाथदादा इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे  बोलत होते. (Raghunathdada Patil slams Raosaheb Danve over statement on delhi farmers protest) शेतकरी आत्महत्यांचा कलंक पुसण्यासाठी शेतकरी संघटनेने २८ नोव्हेंबरपासून ‘जनप्रबोधन यात्रा’ काढली आहे. ही यात्रा पुणे जिल्ह्यात इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे आलेली आहे. दानवे यांच्याबद्दलच्या प्रश्नाच्या उत्तरात रघुनाथदादा म्हणाले की, दानवे कधी शेतकऱ्यांना ‘साले’ म्हणतात; कधी वेगवेगळी वक्तव्ये करतात. हा माणूस जोड्याने मारायच्या लायकीचा आहे.

त्यांच्याबद्दल जास्त बोलण्यात काही अर्थ नाही. भारतीय जनता पक्ष बुडवण्यास रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे दोघे जबाबदार आहेत. पाटील म्हणाले की, “पक्षश्रेष्ठींचे लक्ष वेधून घेण्यासाठी दानवे अशा प्रकारची वक्तव्ये करतात. परंतु अशा प्रकारचे वक्तव्य करणे पक्षाच्या फायद्याचे आहे की तोट्याचे, याचा विचार ते कधीच करत नाहीत. पक्षाचे अध्यक्ष अशा नेत्यांना पक्षात ठेवतात. मोठी पदं देतात. त्यांना केंद्रीय मंत्रिपद दिले जाते. पक्षाने आता अशा लोकांबाबत विचार करून निर्णय घ्यायला हवा. अशा वाचाळवीरांनी आतापर्यंत अनेक पक्षसंघटना बुडवल्या आहेत. ”

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER