अमर, अकबर, अँथनीच रॉर्बट शेठला पराभूत करतील; राष्ट्रवादीनंतर दानवेंना काँग्रेसचे  प्रतिउत्तर

Raosaheb Danve - Sachin Sawant

मुंबई : महाराष्ट्रतील सरकार आम्हाला पाडायचं नाही. राज्यात अमर, अकबर आणि अँथनीच सरकार असून, या तिघांचे पायात पाय आहेत. त्यामुळे त्यांचे तेच पडतील,असे  विधान केंद्रीय कृषी राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत केले  होते . दानवे यांच्या टीकेला राष्ट्रवादीपाठोपाठ (NCP) काँग्रेसच (Congress) प्रवक्ते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी आपल्या ट्विटच्या माध्यमातून  उत्तर दिले  आहे.

अमर, अकबर, अँथनी तिघेही रॉर्बट शेठला पराभूत करतील,  असे  म्हणत सावंत यांनी दानवेंवर निशाणा साधला .

दरम्यान महाराष्ट्र सरकार (Maharashtra Government) म्हणजे अमर-अकबर-अँथनी आहे, असे दानवे म्हणाले . बरोबर आहे. कारण महाराष्ट्राच्या बदनामीचे त्यांचे प्रयत्न आम्ही हाणून पाडतो आणि करोना (Corona) संकटातही राज्य प्रगतीपथावर नेतो. कारण – होनी को अनहोनी कर दे, अनहोनी को होनी, एक जगह जब जमा हो तीनो अमर, अकबर, अँथनी, असे  म्हणत राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दानवेंवर निशाणा साधला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER