कपिल देवला वाढदिवसानिमित्त रणवीर सिंहने दिल्या शुभेच्छा

Happy Birthday to Kapil Dev by Ranveer Singh

क्रिकेटमधील देव म्हणजे कपिल देव (Kapil Dev). कपिल देवच्या नेतृत्वाखालीच भारताने सर्वप्रथम 1983 मध्ये वर्ल्ड कप जिंकला होता. हा वर्ल्ड कप जिंकण्यात कपिल देवसह संपूर्ण भारतीय टीमचा मोलाचा वाटा होता. कपिलने या वर्ल्डकपमध्ये झिंबाब्वेविरुद्ध खेळताना 175 धावा केल्या होत्या. मात्र त्याची ही इनिंग रेकॉर्डिंग झालेली नसल्याने त्याच्या बॅटिंगचा आनंद क्रिकेटप्रेमींना आजवर घेता आलेला नाही. त्याच्या या खेळीमुळेच भारताने पुढे वाटचाल सुरु ठेवली होती. कपिल देव आणि भारतीय टीमच्या या विक्रमावर आधारित 83 नावाने एक सिनेमा तयार होत आहे. या सिनेमात रणवीर सिंह (Ranveer Singh) कपिल देवची भूमिका साकारीत आहे. आणि म्हणूनच रणवीरने काल म्हणजे बुधवारी कपिल देवला त्याच्या 62 व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.

रणवीर सिंहने कपिल देवला वाढदिवसाच्या शुभेच्छा एका व्हीडियोतून दिल्या आहेत. हा व्हीडियो सोशल मीडियावर रणवीरने शेअर केला आहे. हा व्हीडियो प्रचंड व्हायरल झाला आहे. व्हीडियोत कपिल देवची विविध रुपे दाखवण्यात आली आहेत. कपिलला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना रणवीरने लिहिले आहे, मोठ्या उंचीचा कॅप्टन. एक खूप चांगला माणूस. आम्हाला त्यांच्या अलौकिक कथेवर सिनेमा बनवण्याची परवानगी देण्यासाठी आणि आम्हाला स्वीकारण्यासाठी खूप खूप आभार. या खास दिनी कपिल देवला चांगले स्वास्थ्य आणि खूप आनंद लाभो. यासोबतच रणवीरने हा 83 आहे, असा हॅशटॅगही लिहिलेला आहे,

भारताने 1983 मध्ये जिकलेल्या वर्ल्ड कपवर आधारित तयार झालेला हा सिनेमा गेल्या वर्षी रिलीज होणार होता. पण कोरोनामुळे रिलीज होऊ शकला नव्हता. मात्र यावर्षी हा सिनेमा प्रदर्शित केला जाणार आहे. रणवीर सिंहने कपिल देवची भूमिका केली असून त्याची पत्नी दीपिकाने कपिलच्या पत्नीची रोमीची भूमिका साकारली आहे. सध्याचा लोकप्रिय अभिनेता पंकज त्रिपाठी टीम मॅनेजरच्या भूमिकेत दिसणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER