रणवीर सिंह म्हणतो, दीपिकाचा पती असल्याचा अभिमान वाटतो

Maharashtra Today

पडद्यावर ज्याप्रमाणे रणवीर सिंह (Ranveer Singh) आणि दीपिकामध्ये (Deepika Padukone) चांगली केमिस्ट्री दिसते तशीच चांगली केमिस्ट्री वास्तव जीवनातही त्यांच्यात आहे. आणि एकमेकांवरील प्रेम व्यक्त करण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. चित्रपट पुरस्कार समारंभ असो वा एखादे शूटिंग दोघेही सार्वजनिकरित्या एकमेकांवरील प्रेम व्यक्त करीत असतात. सिनेमातही दोघे एकमेकांसोबत काम करण्याचा प्रयत्न करतात. त्यांचे हे प्रेम ते सोशल मीडियावरही शेअर करीत असतात त्यामुळे त्यांचे फोटो नेहमीच व्हायरल होत असतात. रणवीरने दीपिकाचा पती असल्याचा अभिमान वाटत असल्याची एक पोस्ट सोशल मीडियावर टाकली आहे. त्याची ही पोस्ट प्रचंड व्हायरल झाली असून फॅन्सनीही त्याच्या यो पोस्टचे फार कौतुक केले आहे.

काही दिवसांपूर्वीच दीपिकाने एक वेबसाईट लाँच केली. दीपिकाच्या या कामामुळे रणवीर प्रचंड आनंदी झाला आहे. हा आनंद सगळ्यांबरोबर शेअर करताना रणवीरने दीपिकाला उद्देशून एक पत्र लिहिले आहे. या पत्रात त्याने दीपिकाची प्रचंड प्रशंसा केली आहे. या पत्रात रणवीर सिंह म्हणतो, ‘’दीपिका तू माझ्या आयुष्यात आल्याने मी स्वतःला खूप नशीबवान समजतो. ज्या दीपिकाला मी पाहिले ती दीपिका जगातील सगळ्यात सुंदर महिला आहे. हे मी केवळ तुझा पती आहे म्हणून बोलत नाही तर तू एक अशी महिला आहेस जी सगळ्या जगावर प्रेम करते म्हणून मी तसे बोलतो. तुझ्यात प्रेम, करुणा, दया, बुद्धी, सौंदर्य, अनुग्रह आणि सहानुभूति हे सर्व गुण आहेत आणि त्यामुळेच तू एक सर्वगुणसंपन्न व्यक्ती आणि उत्कृष्ट अभिनेत्री आहेस. तुझ्यात लवचिकपणा, धैर्य आणि इच्छाशक्ती मोठ्या प्रमाणावर आहे. तुला प्रोत्साहित करण्यासाठी मी कधी कधी थांबतो. तुझा आत्मा विशेष आहे. तू चांगल्या गोष्टी करण्यासाठीच जन्म घेतला आणि त्यासाठीच मी म्हणतो की तुझा पती असल्याचा मला अभिमान वाटतो.’’

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button