‘मास्टर’च्या रिमेकमध्ये रणवीर सिंह आणि रणबीर कपूर?

Ranveer Singh and Ranbir Kapoor in the remake of 'Master'

देशभरातील थिएटर सुरु झाल्यानंतर साऊथमध्ये मोठ्या स्टार्सचे सिनेमे रिलीज होऊ लागले आहेत. हिंदीतील स्टार्सनी मात्र अजून आपले सिनेमे थिएटरमध्ये रिलीज करण्याची हिंमत दाखवलेली नाही. रवी तेजाचा ‘क्रॅक’ जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात साऊथमध्ये रिलीज झाला आणि त्याने कमाईचा विक्रम केला. त्यानंतर गेल्या आठवड्यात थलपती विजय आणि विजय सेतुपती या अभिनेत्यांची टक्कर असलेल्या मास्टर सिनेमा रिलीज करण्यात आला. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर कमाईचा विक्रम करणे सुरु केले आहे. हिंदीतही हा सिनेमा डब करून रिलीज करण्यात आला आहे. पण हिंदीतील प्रेक्षकांनी मात्र अजून त्याला म्हणावा तसा प्रतिसाद दिलेला नाही. मात्र रिलीजनंतर लगेचच मास्टरच्या हिंदी रिमेकचे अधिकार निर्माता मुराद खेतानी यांनी घेतलेले आहेत. मुराद यांनीच हिंदीत शाहीद कपूरला घेऊन ‘कबीर सिंह’ची निर्मिती केली होती. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाला होता.

मुराद यांनी मास्टरच्या हिंदी रिमेकचे राईट्स घेतल्याच्या बातम्या आल्याबरोबर या रिमेकमध्ये बॉलिवुडमधील कोणते दोन कलाकार मुख्य भूमिकांना न्याय देऊ शकतील यावर चर्चा सुरु झाली आहे. एका वेबसाईटने बॉलिवुडमधील लोकांसोबतच प्रेक्षकांनाही या दोन भूमिका कोण साकारू शकेल याबाबत विचारले. यासाठी सलमान खान, आमिर खानपासून अनेक कलाकारांचे ऑप्शन देण्यात आलेले होते. मात्र प्रेक्षकांनी रणवीर सिंह (Ranveer Singh)आणि रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) नावाला पसंती दिली आहे. प्रेक्षकांची पसंती पाहून निर्माते या जोडीला प्रथमच एकत्र आणू शकतील. पण निर्मात्यांनी अजून याबाबत काहीही घोषणा केलेली नाही किंवा कलाकारांबाबत काहीही सूतोवाचही केलेले नाही. त्यांनी सध्या फक्त हिंदी रिमेकचे अधिकार घेतलेले आहेत. मात्र प्रेक्षकांची पसंती पाहून निर्मात्यांनी रणवीर आणि रणबीरला एकत्र घेतले तर तो आकर्षणाचा विषय ठरेल हे मात्र नक्की.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER