
गेल्या वर्षी रुपेरी पडद्यावर आलेल्या झोया अख्तर द्वारा दिग्दर्शित गली ब्वॉय सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. प्रेक्षकांना या सिनेमातील रणवीर सिंह आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांची जोडी चांगलीच आवडली होती. एखाद्या जोडीचा सिनेमा हिट झाला की त्या जो़डीला घेऊन सिनेमा बनवण्यासाठी निर्माते पुढे सरसावतात. पण रणवीर सिंह आणि आलिया भट्टने गली ब्वॉय सारखा हिट सिनेमा दिला तरी या दोघांना कोणीही रिपीट केले नव्हते. मात्र आता हे दोघे पुन्हा एकदा एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
रणवीर सिंहने (Ranveer Singh) अत्यंत कमी वेळात बॉलिवुडमध्ये (Bollywood) स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे. स्वतःची एखादी विशिष्ट अशी इमेज त्याने तयार होऊ दिलेली नाही. वेगवेगळ्या भूमिका साकारून आपण सर्व प्रकारच्या भूमिका करू शकते हे त्याने दाखवून दिले आहे. त्यामुळे त्याच्याकडे विविध प्रकारच्या भूमिका असलेले सिनेमा सध्या आहेत. खरे तर रणवीरचा कपिल देवची भूमिका असलेला 83 हा सिनेमा यावर्षी रिलीज होणार होता. पण कोरोनामुळे हा सिनेमा आता पुढील वर्षी रिलीज होणार आहे. 83 बरोबरच रोहित शेट्टीबरोबरचा सूर्यवंशीही पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे. याशिवाय तो जयेशभाई जोरदार नावाचाही एक सिनेमा करीत आहे. आलियानेही रणवीरप्रमाणे कमी वेळातच प्रचंड यश मिळवले आहे. ती सध्या संजय लीला भंसालीच्या गंगुबाई काठियावाड आणि करण जोहरच्या ब्रह्मास्त्र मध्ये काम करीत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार करण जोहर या दोघांना घेऊन एका सिनेमाची योजना तयार करीत आहे. त्याच्याकडे एक चांगली स्टोरी असून त्यात रणवीर आणि आलिया फिट आहेत असे करणला वाटले आणि त्याने त्या दोघांशी बोलणीही केली आहेत. या सिनेमाचे शूटिंग पुढील वर्षी सुरु करण्यात येणार आहे. ही एक थ्रिलर लव स्टोरी असेल असे सांगितले जात आहे. रणवीर हातातील प्रोजेक्ट पूर्ण केल्यानंतर या सिनेमाच्या कामाला सुरुवात करणार आहे. आलियाही गंगुबाईचे शूटिंग पूर्ण केल्यानंतर या सिनेमाचे काम सुरु करणार आहे. शूटिंग सुरु करण्यापूर्वी 25 दिवसाचे एक वर्कशॉप करणने आयोजित केले असून त्यात रणवीर आणि आलिया भाग घेतील. हा वर्कशॉप संपल्यानंतर सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली जाणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला