सोलापूरच्या उपमहापौरांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल

FIR

सोलापूर :- नियमबाह्य कामांसाठी भाजपचे उपमहापौर राजेश काळे (Rajesh Kale) यांनी महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, उपायुक्त धनराज पांडे, विभागीय अधिकारी निलकंठ मठपती यांना अर्वाच्य  भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी सोलापूर महापालिकेतील भाजपचे उपमहापौर राजेश काळे यांच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काळे यांनी नियमबाह्य कामांसाठी अधिकाऱ्यांना शिवीगाळ केल्याची माहिती सूत्रांद्वारे मिळाली आहे. माजी मंत्री सुभाष देशमुख यांच्याशी संबंधित लोकमंगल समूहाच्यावतीनं आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यासाठी ई-टॉयलेट कचरापेट्या आणि अन्य साहित्याची व्यवस्था करण्यासाठी राजेश काळे यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रशासकीय मान्यतेशिवाय पालिकेची मालमत्ता कुठेही पाठवता येणार नाही. ई-टॉयलेट कचरापेट्या आणि इतर साहित्याची व्यवस्था करण्यासाठी पत्रव्यवहार करणं आवश्यक असल्याचं पालिका अधिकाऱ्यांचं मत आहे. त्यावरून संतापलेल्या उपमहापौर राजेश काळे यांनी पालिका आयुक्त, उपायुक्त, विभागीय अधिकारी यांना फोन करून शिवीगाळ केल्याचं बोललं जात आहे.

बेकायदेशीर कामासाठी राजेश काळे अनेक दिवसांपासून पालिका अधिकाऱ्यांवर दबाव आणत होते. असा आरोप अनेक अधिकाऱ्यांकडून सातत्याने करण्यात येत होता. त्यानुसार आता सदर बझार पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER