रंकीरेड्डी व पोनप्पा जोडी ‘हे’ यश मिळवणारे पहिलेच भारतीय

Satwiksairaj Rankireddy - Ashwini Ponnappa

भारतीय बॅडमिंटनपटू (Badminton) सात्त्विक  साईराज रंकीरेड्डी (Satwiksairaj Rankireddy) व अश्विनी पोनप्पा (Ashwini Ponnappa) यांनी २०२१ ची सुरुवात चांगली केली आहे. त्यांनी ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या जोडीला पराभवाचा धक्का देत थायलंड ओपन (Thailand Open) या वर्ल्ड टूर १००० दर्जाच्या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे.

वर्ल्ड टूर १००० दर्जाच्या स्पर्धेच्या अंतिम चौघात स्थान मिळविणारी ही पहिलीच भारतीय जोडी आहे. सात्त्विक व अश्विनी यांनी मलेशियाच्या पाचव्या मानांकित चान पेंग सून व गोह लिऊ यिंग यांना तीन गेममध्ये पराभवाचा धक्का दिला. सव्वा तास रंगलेला हा सामना भारतीय जोडीने १८-२१, २४-२२, २२-२० असा जिंकला.

ही मलेशियन जोडी ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती आहे. त्यांच्याविरुद्धच्या पाच लढतीत सात्त्विक व अश्विनीचा हा तिसरा विजय होता. २०१९ मध्येसुद्धा थायलंड ओपनच्या पहिल्या फेरीत भारतीय जोडीने त्यांच्यावर २१-१८, १८-२१, २१-१७ असा विजय मिळवला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER