भाजपला धक्का ; पंढरपूर पोटनिवडणूक प्रचारातील प्रमुख चेहरा कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई :- भारतीय जनता पक्षाचे नेते आणि विधान परिषद सदस्य रणजीतसिंह मोहिते पाटील यांची कोरोना (Corona) चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. रणजीतसिंह मोहिते पाटील (Ranjit Singh Mohite Patil) यांनी पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीतील अनेक प्रचारसभांना आणि मेळाव्यांना उपस्थिती दर्शवली आहे.

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराची धुरा रणजीतसिंह मोहिते पाटलांकडे आहे. अशात त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. कोरोना विषाणूची लागण झाल्याची माहिती स्वतः रणजीतसिंह यांनी आपल्या फेसबुक पोस्टद्वारे दिली आहे.

‘माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे मी क्वारन्टाइन झालो आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना विनंती आहे की, त्यांनी आपली कोरोना चाचणी करुन घ्यावी आणि स्वतःची काळजी घ्यावी , असे पाटील म्हणाले.

ही बातमी पण वाचा : शिवसेना-काँग्रेसने एकत्र मारली बाजी, भाजप-राष्ट्रवादीच्या पदरी निराशाच 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button