रणजित डिसले गुरुजी कोरोना पॉझिटिव्ह; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आले होते संपर्कात

Disley Guruji Covid Positive

मुंबई : युनेस्को आणि लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर पुरस्कार सोलापूरच्या परितेवाडी शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना मिळाला आहे. त्यांच्या या कर्तृत्वामुळे जगभरातून डिसले गुरुजींचं कौतुक केलं जात आहे. दरम्यान त्यांना कोरोनाची बाधा झाली आहे.

जिल्हा परिषद सोलापूरचे शिक्षक रणजितसिंह महादेव डिसले यांचा दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला होता. त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचीही भेट घेतली होती. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी रणजितसिंह डिसले यांचं कौतुक केलं होतं. तसंच डिसले सरांनीही आपल्याला शिक्षण क्षेत्रात भरीव कामगिरी करायची आहे, असं राज ठाकरे यांना सांगितलं होतं. महाराष्ट्राची मान डिसले सरांमुळे जगात उंचावली आहे, अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली होती.

मुंबईहून बार्शीला परतल्यानंतर डिसले सरांना थकवा व इतर त्रास जाणवू लागला. त्यांच्या पत्नीला त्रास सुरू झाला. त्यामुळे त्यांची कोरोना संबंधित चाचणी घेण्यात आली असता डिसले दाम्पत्य कोरोनाबाधित आढळून आले. इतर कुटुंबीयांची चाचणी नकारात्मक आली. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून आपल्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीने स्वतःहून कोरोना चाचणी करून घ्यावी. यात कोणत्याही प्रकारची जोखीम पत्करू नये, असे आवाहन केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER