राज्यपालांकडून रणजितसिंह डिसळे यांचा राजभवन येथे हृद्य सत्कार

Governor Bhagat Singh Koshyari - Ranjitsinh Disale

जागतिक शिक्षक पुरस्कार (Global Teacher Award) प्राप्त सोलापुर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शिक्षक रणजितसिंह डिसळे (Ranjitsinh Disale) यांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी आज राजभवन येथे हृद्य सत्कार केला.

डिसळे यांचे अभिनंदन करुन राज्यपालांनी त्यांना शाल, श्रीफळ व भेटवस्तू दिली. यावेळी डिसळे यांचे आई वडील देखील उपस्थित होते.

दिनांक ३ डिसेंबर रोजी डिसळे यांना लंडन येथील वर्की फाउंडेशनतर्फे दिल्या जाणारा ग्लोबल टीचर अवॉर्ड जाहिर झाल्यावर राज्यपालांनी त्यांचे फोनवरुन अभिनंदन केले होते व राजभवन भेटीचे निमंत्रण दिले होते. त्यानुसार रणजितसिंह डिसळे आज आईवडीलांसह राज्यपाल कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेतली.

Ranjitsinh Disale - Governor Bhagat Singh Koshyari

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER