रणजी ट्रॉफीचे सामने होणार फेब्रुवारीच्या शेवटी?

Ranji Trophy matches to be played at end of February

कोरोनामुळे आतापर्यंत होऊ न शकलेल्या रणजी ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेचे सामने फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात होतील असे संकेत आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) वार्षिक सर्वसाधारण सभेत रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) स्पर्धा घ्यावी की विजय हजारे ट्रॉफीचे सामने घ्यावेत याचा निर्णय होऊ शकला नव्हता; मात्र आता रणजी स्पर्धेचे सामने व्हावेत याला संघटना अनुकूल असल्याचे समजते.

बीसीसीआयने मात्र या मुद्द्यावर अद्याप कोणतेही भाष्य केलेले नाही आणि येत्या आठवड्यात ते काही घोषणा करतील असा अंदाज आहे. बंगाल व केरळच्या संघांनी तर रणजी सामने होण्याच्या दृष्टीने लाल चेंडूसह सरावसुद्धा सुरू केला आहे. खेळली गेलीच तर यंदाची रणजी स्पर्धा सैयद मुश्ताक अली ट्रॉफीप्रमाणे खेळली जाईल असे संकेत आहेत. त्यानुसार प्रत्येक संघाला पाच साखळी सामने खेळायला मिळतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER