कलामहर्षी बाबुराव पेंटर यांना रंगबहारने अर्पण केली श्रद्धांजली

Kalamaharshi Baburao Painter

कोल्हापूर : येथील रंगबहार कला संस्थेने महर्षी बाबुराव पेंटर त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त श्रद्धांजली अर्पण केली. दळवीज आर्ट स्कुलचे प्राचार्य अजेय दळवी यांनी पद्माराजे उद्यानातील महर्षी बाबुराव पेंटर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला.

अजेय दळवी

चित्रपटसृष्टीतील पहिलेवहिले तंत्रज्ञान बाबूराव पेंटर यांनीच रूढ केले. यामध्ये भारतीय कॅमेर्‍याने चित्रित केलेला पहिला चित्रपट ‘सैरंध्री’, याच चित्रपटासाठी स्त्री कलाकाराकडून स्त्री पात्राची भूमिका, चित्रपटांचा सुवर्णकाळ सुरू करण्याचा प्रभातच्या आधी महाराष्ट्र फिल्म कंपनीचे मानचिन्ह, निर्मिती, वेशभूषा, ट्रिकसीन प्रसिद्धीसाठी पोस्टरचा वापर, ही सारी तंत्रे पेंटरांनी पहिल्यांदाच चित्रपटासृष्टीत रूढ केली, अशी माहिती अजेय दळवी यांनी दिली.

श्रीकांत डिग्रजकर म्हणाले, चित्रकार,शिल्पकार ,तंत्रज्ञ,चित्नपट-निर्माते व दिग्दर्शक अशा बहुआयामी कार्यामुळेच कलामहर्षी म्हणून बाबूराव पेंटर गौरविले जात. प्रतिमा चित्रणातील कौशल्य व रंगभूमीवरील नेपथ्य, विशेषत: पडद्याची कलात्मकता या बाबतींत त्यांनी खूपच लौकिक मिळविला होता.

रियाज शेख यांनी सांगिलते की – चित्र शिल्प, आदी कलाक्षेत्रात बाबूराव पेंटर यांनी स्वाध्यायाच्या बळावर आपली प्रगती करून घेतली होती. बाबूराव पेंटर यांच्या चित्रकारितेने रसिकांना भुरळ घातली होती. अशा कालखंडाचे प्रतिनिधी म्हणून बाबूराव पेंटर यांचे कलाकर्तृत्व उदंड आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER