राष्ट्रपती राजवटीची मागणी राणेंची वैयक्तिक; भाजपाचा संबंध नाही – सुधीर मुनगंटीवार

Narayan Rane-Sudhir Mungantiwar

मुंबई :  राज्यात कोरोनाची स्थिती गंभीर होत चालल्याच्या पार्श्वभूमीवर काल भाजपाचे नेते नारायण राणे राज्यपाल कोश्यारी यांना भेटण्यास राजभवनावर गेले होते. त्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना कोरोनाच्या स्थितीवर नियंत्रण मिळवण्यात ठाकरे सरकार अपयशी ठरल्याचे म्हणत राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी राणेंनी केली. गेल्या काही दिवसांत राजभवनावर नेत्यांचा राबता वाढला आहे.

काल चक्क राष्ट्रवादीचे अध्यक्ष व महाविकास आघाडी सरकार निर्मितीचे सूत्रधार शरद पवार राज्यपालांना भेटले. त्यानंतर थेट मातोश्रीवर जाऊन त्यांनी मुख्यमंत्री ठाकरेंची भेटदेखील घेतली. या सर्व हालचाली पाहता राज्याच्या राजकारणात पडद्यामागे काहीतरी घडत आहे, असे दिसते.

ही बातमी पण वाचा: नारायण राणेंचा गौप्यस्फोट, पवार आणि ठाकरेंमध्ये भेट झालीच नाही  

याच पार्श्वभूमीवर राणेंच्या राष्ट्रपती राजवटीची मागणी याला महत्त्व प्राप्त झाले व हीच भूमिका भाजपाची पण आहे का, असे प्रश्न निर्माण झालेत. मात्र, भाजपाचे वरिष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी यावर स्पष्टीकरण दिले असून राष्ट्रपती राजवटीची मागणी राणेंची वैयक्तिक भूमिका आहे, भाजपाचा संबंध नाही, असे म्हटले आहे.

दरम्यान, थोड्याच वेळात देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद आहे. ते काय बोलतील याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER