राणेंचा प्रभाव : सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपाचे २८ सदस्य अविरोध निर्वाचित

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गात ग्रामपंचायत निवडणुकांच्या निमित्ताने शिवसेना विरुद्ध राणे (भाजपा) अशी निकराची लढत होते आहे. यात आमदार नितेश राणे (Nitesh rane) यांनी शिवसेनेला ‘जोर का झटका’ दिला. नितेश राणे यांच्या पुढाकाराने २८ ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. (Nitesh Rane Dominate Shiv Sena again in Sindhudurg)

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यात १३ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. निवडणुकीआधीच वैभववाडीत राजकारण तापू लागले आहे. तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या १०३ जागांसाठी निवडणूक होत असून त्यातील २८ ग्रामपंचायत सदस्य राणेंच्या पुढाकाराने अविरोध निवडून आले.या सदस्यांचा आमदार नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आला. राणेंनी शक्तीप्रदर्शन करत सेनेला आपली ताकद दाखवून दिली.

वैभववाडीतील मांगवली या महत्त्वाच्या ग्रामपंचायतीवर भाजपाचे बिनविरोध पॅनेल विजयी झाले. त्याबद्दल आमदार नितेश राणेंनी मांगवली गावातील गावकऱ्यांचे आभार मानले तसेच गावच्या विकासासाठी निधीचीही घोषणा केली.

राणेंचे वर्चस्व

गेले अनेक वर्षांपासून खा. नारायण राणे यांचे सिंधुदुर्गात वर्चस्व कायम असल्याचं दिसते. राणे शिवसेनेत होते तेव्हा निवडणुकीत राणे सेनेच्या उमेदवारंना भरघोस मतांनी निवडून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावत. नंतर राणे काँग्रेसमध्ये गेल्यानंतर भाजपा-सेनेला धूळ चारण्यात राणेंना बहुतांशी वेळेला यश आले. तोच कित्ता राणे आता भाजपामध्ये आल्यानंतर गिरवत आहेत. भाजपाचे २८ सदस्य अविरोध निर्वाचित झाले .

ही बातमी पण वाचा : …पण घरातली उणीधुणी बाहेर निघत आहे म्हणून मोर्चा! नितेश राणेंचा शिवसेनेवर हल्लाबोल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER