साहेबांच्या आदेशापेक्षा मुख्यमंत्रिपद मोठे वाटते; राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका

Narayan Rane & Uddhav Thackeray

मुंबई : बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी औरंगाबादमध्येच औरंगाबादला ‘संभाजीनगर’ जाहीर केले होते. आता मुलगा मुख्यमंत्री असताना त्याची पूर्तता होत नाही हे दुर्दैव आहे. साहेबांच्या आदेशापेक्षा मुख्यमंत्रिपद मोठे वाटते. लाचारी करून पद मिळवले, त्याही पदाचा घरात बसून वापर होत नाही. औरंगाबादचे संभाजीनगर जाहीर करायचे सोडून टिपू सुलतानची जयंती साजरी करत आहेत. ही शिवसेना नाही.

आम्ही होतो ती वेगळी आणि आताची वेगळी आहे, अशी टीका भाजपाचे नेते नारायण राणे (Narayan Rane) यांनी केली. औरंगाबादच्या नामकरणावर बोलताना ते म्हणाले की, “बाळासाहेब वरून पाहात असतील तर अशा पुत्राला काय म्हणत असतील. औरंगाबादमध्ये संभाजीनगर म्हणून बाळासाहेबांनी जाहीर केले होते. मुख्यमंत्री असले तरी सरकारी यंत्रणा हाताळण्याचे ज्ञान, अभ्यास नाही. गाडी चालवायची माहिती असेल; पण सरकार चालवण्याचा अभ्यास नाही. त्यामुळे सरकार पुढे जात नाही. सरकारच्या अपयशाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जबाबदार आहेत.” अशी टीका नारायण राणे यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER