सिंधुदुर्गात राणेच! भाजपाने जिंकल्या ४५ ग्रामपंचायती

सिंधुदुर्ग : ग्रामपंचायत निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपाने (BJP) आपले वर्चस्व कायम राखले. ४५ ग्रामपंचायती  जिंकल्या. शिवसेनेला २१ तर राष्ट्रवादीला १ आणि गाव पॅनलला  ३ ग्रामपंचायती मिळाल्या. सिंधुदुर्गात नारायण राणेंनी (Narayane Rane) आपले वर्चस्व दाखून दिले. मालवणमध्ये आमदार वैभव नाईक यांना तर सावंतवाडीमध्ये माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांना मोठा दणका दिला.

देवगड विधानसभा मतदारसंघात आमदार नितेश राणे यांनी आपले वर्चस्व कायम राखले. देवगड तालुक्यात भाजपाने १७ ग्रामपंचायतींची सत्ता मिळवली आहे. शिवसेना ४, राष्ट्रवादी १ आणि गाव पॅनलकडे १ ग्रामपंचायत आली. वैभववाडी तालुक्यात भाजपा ९ आणि शिवसेनेकडे ४ ग्रामपंचायती आल्या. कणकवलीत २ शिवसेना आणि १ भाजपाकडे आली आहे. मालवण विधानसभा मतदारसंघात सेनेचे आमदार वैभव नाईक यांना धक्का बसला.

मालवण तालुक्यात ५ ग्रामपंचायतींवर भाजपाने सत्ता मिळविली आहे. शिवसेनेकडे १ ग्रामपंचायत आली आहे. कुडाळ तालुक्यात ४ ग्रामपंचायतींवर भाजपा, ४ शिवसेना आणि १ गाव पॅनलकडे आली. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांना मोठा धक्का बसला. सावंतवाडी तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत कोलगाव भाजपाने जिंकली. भाजपा आमदार आशिष शेलार यांची सासुरवाडी दांडेली ग्रामपंचायतीवर भाजपाचे कमळ फुलले. तालुक्यात ८ ग्रामपंचायती भाजपाकडे तर ३ शिवसेनेकडे आल्या आहेत. दोडामार्ग तालुक्यात २ ग्रामपंचायती सेनेकडे तर १ ग्रामपंचायत ग्रामविकास पॅनलकडे आली आहे. वेंगुर्ले तालुक्यात १ शिवसेनेकडे आणि १ ग्रामपंचायत भाजपाकडे आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER