राणेंचे कट्टर समर्थक ठरले कोरोनाचे बळी

Madhusudan Bandivadekar

सिंधुदुर्ग : भाजप (BJP) खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते मधूसुदन बांदिवडेकर (Madhusudan Bandivadekar) यांचे कोरोनामुळे (Corona) निधन झाले. कोरोनाची लागण झाल्यानंतर उपचार सुरु असतानाच बांदिवडेकरयांनी अखेरचा श्वास घेतला. ओरोस येथील जिल्हा रुग्णालयाच्या कोव्हिड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल होते. मात्र उपचार सुरु असतानाच बांदिवडेकर यांची प्राणज्योत मालवली.

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत त्यांनी उपाध्यक्षपदही भूषवले आहे. कणकवली तालुक्यात मधूसुदन बांदिवडेकर शिवसेनेचे पहिले सभापती ठरले होते. नारायण राणे यांच्यासह शिवसेना, काँग्रेस, महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष आणि भाजप असा त्यांचा राजकीय प्रवास होता. सध्या ते भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस म्हणून काम बघत होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER