राणेंनी आम्हाला शिकवू नये; गद्दारांच्या यादीत माझं नाव नाही – गुलाबराव पाटील

राणेंसाठी आम्ही जेव्हा फायटर होतो, तेव्हा त्यांचे पोट्टे बनियनवर होते

Nitesh Rane - Narayan Rane - Nilesh Rane - Gulabrao Patil

अहमदनगर : राणे शिवसेना भांडण हे राज्याला चांगलेच ठाऊक आहे. शिवसनेवर(Shiv Sena) आगपाखड करण्यात राणे कोणतीही संधी सोडत नाहीत. आता राणे पुत्रांनी शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांच्याशी पंगा घेतला आहे.

त्यावर गुलाबराव पाटील(Gulabrao Patil) यांनीही राणेंना खडे बोल सुनावले आहेत. “भाजप(BJP) खासदार नारायण राणे(Narayan Rane) जेव्हा शिवसेनेत होते, तेव्हा आम्ही त्यांचे पाठीराखे होतो. त्यावेळी त्यांचे पोट्टे बनियनवर होते. त्यामुळे त्यांनी मला शिकवू नये” ‘मी भगव्याच्या धुंदीत आहे. तुम्ही तर भगवा सोडून पळाले, काँग्रेसमध्ये(Congress) गेले, नंतर भाजपमध्ये आले. मी निष्ठावंत आहे. गद्दारांच्या यादीत माझे नाव नाही. त्यामुळे आधी आपण आपली औकात व निष्ठा कुठे आहे ती ओळखावी, नंतर माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर टीका करावी, असा घणाघात शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी नारायण राणे यांच्यावर केला. ते नगर मध्ये बोलत होते.

माजी मंत्री अनिल राठोड(Anil Rathod) यांच्या निधनानंतर परिवाराचं सांत्वन करण्यासाठी गुलाबराव पाटील आज (11 ऑगस्ट) अहमदनगरला आले होते. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी नारायण राणे आणि त्यांचा मुलगा आमदार नितेश राणे यांना चांगलेच सुनावले.

“मी छत्तीस वर्षांपासून शिवसेनेचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे त्यांनी आम्हाला धमक्या देऊ नये. असे गुलाबराव पाटील म्हणाले.

काय आहे नेमके प्रकरण –
गुलाबराव पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी “नारायण राणे हे सुशिक्षित बेरोजगार राजकारणी आहेत. आता त्यांना काहीही कामधंदा उरलेला नाही. ते घरी काही बोलतात, बाहेर काही वेगळेच बोलतात. शेवटी त्यांना अशी विधाने करुन स्वतःचा टीआरपी म्हणजेच प्रसिद्धी मिळवायची असते.” “नारायण राणे स्वतः मुख्यमंत्री असताना कोकणात कोणताही नवीन प्रकल्प आणू शकले नाहीत. त्यामुळे त्यांनी बाकीच्या गोष्टींविषयी तर काही बोलूच नये. ते जर असे काही बोलले नाहीत, तर त्यांच्याकडे कुणी लक्ष देत नाही” असा घणाघात गुलाबराव पाटील यांनी केला होता.

त्यानंतर, “गुलाबराव पाटील यांच्या नावातच गुलाब आहे. त्यामुळे त्यांना मी काय उत्तर देणार? गुलाब ज्यांच्या नावात असेल त्यांनी धंद्याविषयी बोलू नये. नारायण राणे यांची उंची किती? गुलाबराव पाटील शुद्धीवर किती तास असतात? याची माहिती घेऊन उत्तर देऊ”, असा टोला नितेश राणे यांनी लगावला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER