राणेंनी पुन्हा उखरून काढले सुशांत आत्महत्या प्रकरण म्हणाले, ती आत्महत्या नाही तर खूनच, आदित्य ठाकरे जेलमध्ये जातील

Narayane Rane & Aditya Thackeray

मुंबई :- दसरा मेळाव्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) भाषणानंतर आज भाजपचे राज्यसभेचे खासदार नारायण राणे (Narayane Rane) यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यावर जोरदार टीका केली आहे तसेच, मागचे पुढचे सगळे दाखले देत त्यांच्या कालच्या विधानांचा समाचार घेतला आहे. अभिनेता सुशांतसिंह (Sushant Singh Rajput) आत्महत्या प्रकरण तीन महिन्यानंतर अखेर तसेबसे थांबले असताना पुन्हा नारायण राणेंनी ते प्रकरण उखरून काढले आहे.

राणे म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सीबीआयबद्दल स्वतःच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना क्लिन चीट दिली. सुशांतची आत्महत्या नाही, तो खून आहे. आरोपी आज ना उद्या गजाआड जातील. त्यात त्यांचा पूत्र आदित्य ठाकरे तुरुंगात जाईल”, असा दावा नारायण राणे यांनी केला आहे. ते पुढे म्हणाले, आज मी स्पष्ट बोलतो. ते सत्तेचा दुरुपयोग करुन मुलाला वाचवत आहेत. सुशांतच्या प्रकरणातील सत्य लवकरच बाहेर येईल. त्याला कुणी मारलं आणि दिशाचा बलात्कार कुणी केला, तिला वरुन खाली कोणी टाकलं हे सर्व बाहेर येईल. या माणसाने त्याच्या आयुष्यात काहीही केलेलं नाही. इतरांच्या मदतीनेच कामं केली”, अशी टीका राणे यांनी केली.

ही बातमी पण वाचा : बाळासाहेबांमुळे शांत आहे, दादागिरी केलीत तर ‘मातोश्री’च्या आतले  आणि बाहेरचे  सगळं बाहेर काढेन : नारायण राणे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER