…म्हणून हिवाळी अधिवेशन दोनच दिवसांचं घेण्याचा घाट घातला ; राणेंची ठाकरे सरकारवर टीका

Narayan Rane - Uddhav Thackeray

मुंबई :- विधीमंडळाचे यंदाचे हिवाळी अधिवेशन मुंबईत होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोनच दिवसाचे अधिवेशन ठेवण्यात आले आहे. अधिवेशनाचा आज (सोमवारी) पहिला दिवस आहे. सभागृहात सत्ताधारी विरोधकांची चांगलीच खडाजंगी पाहायला मिळत आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न याबाबत सत्ताधारी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि विरोधीपक्ष भाजप पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत.

मराठा आंदोलन दडपलं तर सरकरला गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा थेट इशारा नारायण राणे (Narayan Rane) यांनी राज्य सरकारला दिला आहे.

कुडाळ येथे पत्रकारांशी बोलताना नारायण राणे म्हणाले, मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारच्या पदरी अपयश पडलं आहे. याला राज्य सरकारच जबाबादार आहे. सरकारला सुप्रीम कोर्टात योग्य पद्धतीनं बाजू मांडता आली नाही. मात्र, आता याचे राज्यात जे काही दुष्परिणाम होतील, त्याला सरकारच कारणीभूत असेल.

मराठा विद्यार्थ्यांना शिक्षणात त्याचबरोबर नोकरीत आरक्षण मिळालं होतं. ते देखील सरकारला टीकवता आलं नाही. सरकारला मराठी आरक्षणावर बोलायच नाही, म्हणून हिवाळी अधिवेशन (Winter session) केवळ दोनच दिवसांचं घेण्याचा घाट घालण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य दिवाळखोरीत काढण्यात येत आहे. याला सरकारमधील मंत्री जबाबदार आहेत.

महाराष्ट्राची ख्याती, मिळालेलं नावलौकीक देखील धुळीस मिळवण्याचं काम करत असल्याची टीका नारायण राणे यांनी केली.

राणे म्हणाले, राज्य सरकारला शेतकऱ्यांचे प्रश्न, आरोग्याचे प्रश्न , शिक्षणाचे प्रश्न , मराठा आरक्षणाचा प्रश्न याबाबत कोणतीही चर्चाच करायची नाही. त्यामुळे हिवाळी अधिवेशन फक्त दोनच दिवस ठेवण्यात आल्याचा आरोप नारायण राणे यांनी केला. जर सरकार म्हणतंय की, कोरोना कमी होतोय तर अधिवेशन किमान दहा दिवस ठेवायला हवं होतं. सरकारमधल्या तिन्ही पक्षांच्या प्रमुखांची जनतेचे प्रश्न सोडवण्याची इच्छाच नाही, असा टोला राणे यांनी यावेळी लगावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER