रणधीर कपूर यांनी आरके बॅनरबाबत केला मोठा खुलासा

Raj Kapoor- Randhir Kapoor.jpg

आरके फिल्म्स आता बॉलिवूडमध्ये जोरदार कमबॅक करण्यासाठी सज्ज झाल्याची बातमी आहे. ‘मेरा नाम जोकर’, ‘बॉबी’ आणि ‘सत्यम शिवम सुंदरम’ यासारखे संस्मरणीय चित्रपट देणारे निर्माता-दिग्दर्शक राज कपूर (Raj Kapoor) यांचे बॅनर असलेले आरके फिल्म्स बंद असल्याने बॉलिवूडप्रेमींना चुकल्यासारखे वाटते आहे. दोन वर्षांपूर्वी जेव्हा आरके स्टुडिओच्या विक्रीची बातमी आली होती, तेव्हा लोकांना बॉलिवूडचे हे मोठे बॅनर परत मिळण्याची आशादेखील नव्हती. परंतु आता आपल्या या बॅनरबद्दल एक चांगली बातमी शेअर करणार आहोत. आरके फिल्म्स आता बॉलिवूडमध्ये जोरदार कमबॅक करण्यासाठी सज्ज झाल्याची बातमी आहे.

तथापि, काही दिवसांपूर्वी अशा गोष्टी समोर येत होत्या की, पुन्हा एकदा आरके बॅनर सुरू होईल. परंतु प्रत्येक वेळी ही बातमी अफवा असल्याचे सिद्ध झाले. त्याच वेळी, राज कपूर यांचा मुलगा रणधीर कपूर (Randhir Kapoor) यांनी शिक्कामोर्तब केले की, या बॅनरखाली ते पुढचा चित्रपट दिग्दर्शित करणार आहेत. रणधीर कपूर यांनी एका मुलाखतीत सांगितले की, ‘हो, आम्ही एक चित्रपट बनवणार आहोत. आता आम्ही पुन्हा आरके सुरू करीत आहोत. हा चित्रपट एका प्रेमकथेवर असेल आणि राज कपूर यांचा सर्वात मोठा मुलगा म्हणजे मी करीन. सध्या रणधीर यांनी या चित्रपटाच्या कास्टिंगबाबत कोणताही इशारा दिला नाही. काही वर्षांपूर्वी भीषण आगीमुळे आरके स्टुडिओ आणि त्याच्या मालमत्तेचे बरेच नुकसान झाले होते. असं म्हणतात की, वर्ष २०१८ मध्ये हा स्टुडिओ गोदरेज प्रॉपर्टीला विकला गेला होता.

आरके बॅनरखालील हे आहेत संस्मरणीय चित्रपट राज कपूर यांनी बनवलेल्या आरके फिल्म्स स्टुडिओने आजवर अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. यात ‘बूट पॉलिश’, ‘जागते रहो’, ‘मेरा नाम जोकर’, ‘बॉबी’, ‘सत्यम शिवम सुंदरम’, ‘प्रेमरोग’ आणि ‘राम तेरी गंगा मैली’ यासारख्या चित्रपटांचा समावेश आहे. राज कपूर यांचे निधन झाल्यानंतर या बॅनरचा चित्रपट ‘हिना’चे दिग्दर्शनही रणधीर कपूर यांनी पूर्ण केले होते. यानंतर राजीव कपूर यांच्या दिग्दर्शनाखाली ‘प्रेमग्रंथ’ तयार करण्यात आला होता आणि या बॅनरचा शेवटचा चित्रपट ऋषी कपूर दिग्दर्शित ‘आ अब लौट चले’ होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER