रणदीप हुड्डा ‘इन्स्पेक्टर अविनाश’च्या भूमिकेत दिसणार; यूपीच्या पोलीस अधिकाऱ्यावर बनत आहे वेब सीरिज

Randeep Hooda

अभिनेता रणदीप हुड्डा (Randeep Hooda) लवकरच ‘इन्स्पेक्टर अविनाश’ नावाच्या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. या प्रोजेक्टवर काम सुरू झाले आहे. ही वेब सीरिज उत्तरप्रदेशचे पोलीस अधिकारी अविनाश मिश्रा यांच्यावर आधारित आहे. मिश्रा यांनी गुन्हेगारी कारवाया कशा केल्या हे या वेब सीरिजमध्ये दिसून येईल. या शोचे दिग्दर्शन नीरज पाठक करत आहेत. याशिवाय नीरज पाठक याची निर्मितीदेखील करत आहेत. त्यांच्यासमवेत कृष्णा चौधरीही याची निर्मिती करणार आहेत. वेब सीरिजविषयी बोलताना रणदीप हुड्डा म्हणाला, ‘सुपर कॉप अविनाश मिश्रा म्हणून काम करणे खूपच रोमांचक आणि आव्हानात्मक आहे. या मालिकेसह या वर्षाची सुरुवात केल्याबद्दल मला खूप आनंद झाला आहे.

रणदीप हुड्डा म्हणाले की, ही मालिका लोकांना आवडेल आणि लोकांची करमणूक होईल, अशी अपेक्षा आहे. या मालिकेव्यतिरिक्त रणदीप हुड्डा सलमान खानच्या ‘राधे : योर मोस्ट वॉन्टेड भाई’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात सलमान खान, दिशा पाटणी आणि जॅकी श्रॉफ हेसुद्धा दिसणार आहेत. याशिवाय तो बलविंदरसिंग जंजुआच्या ‘अनफेयर अँड लवली’ चित्रपटातही दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत इलियाना डिक्रूझही दिसणार आहे. नुकताच तो हॉलिवूड मूव्ही एक्स्ट्रॅक्शनमध्ये (Extraction) दिसला. नेटफ्लिक्सवर रिलीज झालेला हा हॉलिवूड चित्रपट खूप लोकप्रिय झाला.आतापर्यंत या चित्रपटाला अवघ्या एका महिन्यात नऊ कोटी व्ह्यूज मिळाले आहेत.

या चित्रपटाच्या यशानंतर रणदीप हुड्डा हॉलिवूडमध्ये आणखी काही प्रोजेक्टवर काम करण्याचा विचार करत आहे. रणदीप हुड्डा म्हणतो की, या चित्रपटाने जगभरात प्रचंड लोकप्रियता मिळविली आहे. या चित्रपटात मी माझ्या कामाचा आनंद घेतला आहे. तो म्हणाला की, प्रत्येक कलाकाराची जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचता यावे अशी इच्छा असते. अशा परिस्थितीत आंतरराष्ट्रीय सिनेमाच्या माध्यमातून मला माझी ओळख वाढविण्याची संधी मिळाली. सरबजित, रंगरसिया, किक, हायवे, बॉम्बे टॉकीज, मर्डर यासारख्या चित्रपटांनी लोकप्रियता मिळवलेल्या रणदीप हुड्डाचा स्वतःचा चाहतावर्ग (Fan Base) आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Randeep Hooda (@randeephooda)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER