नवीन वर्षनिमित्त रणबीर कपूरचा ‘एनिमल’ चित्रपटाची घोषणा, समोर आला पहिला व्हिडीओ

Animal

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरने (Ranbeer Kapoor) २०२१ मध्ये दमदार पदार्पण केले आहे. वर्षाच्या पहिल्याच दिवशी त्याने आपल्या चाहत्यांना जबरदस्त सरप्राईज दिले आहे. रणबीरचा नवा चित्रपट ‘एनिमल’ (Animal)चा व्हिडिओ टी-सीरिजने रिलीज केला आहे.

या व्हिडिओत रणबीर कपूरच्या चित्रपटाचा कास्ट आणि क्रू चा देखील खुलासा झाला आहे. या चित्रपटात अनिल कपूर (Anil Kapoor), बॉबी देओल आणि परिणीती चोप्रा मुख्य भूमिकेत आहेत. यापूर्वी परिणीतीऐवजी या चित्रपटात सारा अली खानला घेण्याची चर्चा होती.

या टीझरमध्ये रणबीर कपूरचा आवाज ऐकू येत आहे, ज्यामध्ये तो म्हणतो, ‘पापा अगले जन्म में आप मेरा बेटा बनना, फिर देखना मैं आपको कैसे प्यार करता हूं। और सीखना आप क्योंकि उसके अगले जन्म मैं वापिस बेटा और आप पापा। तब न पापा, अपनी तरह से प्यार करना, मेरी तरह से नहीं। आप समझ रहे हैं न पापा। बस आप समझ लो तो काफी।’

या चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप रेड्डी वांगा यांनी केले आहे. संदीप रेड्डी वांगा यांनी शाहिद कपूर आणि कियारा अडवाणीसह सुपरहिट चित्रपट ‘कबीर सिंह’ बनविला आहे. काही दिवसांपूर्वी त्याने या गुन्हेगारी नाटक (Crime Drama) चित्रपटाची घोषणा केली होती, त्याबद्दल बॉलिवूडमध्ये बरीच चर्चा रंगली होती. संदीप रेड्डीने आपला भाऊ प्रणय रेड्डी याच्यासह भद्रकाली पिक्चर्स नावाची कंपनी तयार केली आहे, ही कंपनी टी सीरीजच्या सहकार्याने रणबीर कपूरच्या या चित्रपटाची निर्मिती करणार आहे.

संदीप रेड्डीच्या या चित्रपटाचे वर्णन मोठ्या बजेटचा चित्रपट म्हणून केले जात आहे. हे चार मोठे कलाकार एकत्र आल्यानंतर रणबीर कपूरचा हा चित्रपट वर्ष २०२१ मधील सर्वाधिक चर्चेचा चित्रपट होणार आहे. तथापि, या चित्रपटाचे शूटिंग सुरू होण्यापूर्वी रणबीर टी सीरीजच्या एका चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करेल, ज्याचे दिग्दर्शक लव्ह रंजन असून रणबीरची नायिका श्रद्धा कपूर आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER